
गडचिरोलीतील पिएम श्री पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात मतदान; लोकशाही प्रक्रियेत सहभाग

जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली,दि.२३ ऑक्टोबर: लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. याच लोकशाही मूल्यांचे पालन करत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज गडचिरोली येथील पीएम श्री पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
मतदान हा लोकशाहीचा आत्मा असून, प्रत्येक मताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

मतदानाच्या माध्यमातून नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे, हा संदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या मतदानातून अधोरेखित झाला.
लोकशाही व्यवस्थेत मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, मतदानातूनच लोकशाहीची ताकद दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे आणि उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मतदानाचा हक्क बजावल्याने लोकशाही प्रक्रियेतील मतदानाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

