
प्रतिनिधी / रुपेश सलामे
पेरमिली :- मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सार्वजनिक गणेश मंडल यांच्या संकल्पनेतून यावर्षी गणेशोत्सवानिमित्त “श्री गणेशा आरोग्य अभियान २०२६” अंतर्गत प्रा आ के पेरमिली यांच्या मार्गदर्शनात जय गणेश मंडल पेरमिली च्या गणेश मंडल परिसरात भव्य आरोग्य तपासणी शिबिर दिनांक २३/०९/२०२६ रोजी घेण्यात आला.
शिबिरात उपस्थित अधिकारी व कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांचे ह्यांचे रक्तदाब व मधुमेह तपासणी भावना ठाकुर एएनएम यांनी केली. मयुर कोड़ापे सर आरोग्य सेवक यांनी आभा कार्ड काढून समुपदेशन केले. रक्त चाचणी साठी रक्ताचे नमुने घेतले. याबाबत मार्गदर्शन व समुपदेशन श्री कोड़ापे आरोग्य सेवक यांनी केले. तसेच आयुष्मान कार्ड कर्मचाऱ्यांना काढून दिले.

सदरिल शिबिरात पेरमिली परिसरातील एकूण ५८ नागरिकानी यांनी आरोग्य शिबिरात सहभागी होऊन त्याचा लाभ घेतला. या शिबिराचा फायदा अनेक कर्मचाऱ्यांना झाला असल्याचे बोलले जात आहे.

