
अमित कत्तीवार|विशेष जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली : तालुक्यातील अतिदुर्गम वाघेझरी येथील शिवसेनेचे बी.एल. ए. मनोज देवू कोवासे (वय ३२) यांचे ५ जुलै रोजी आकस्मिक निधन झाले. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने कोवासे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, सहपालक मंत्री अँड आशिष जयस्वाल विदर्भ विभागीय संपर्क प्रमुख आमदार मनिषाताई कायंदे, पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या आदेशाने या दुःखद प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत, मुलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला, अक्षय पुंगाटी व प्रकाश भाऊ गद्दलवार वैद्यकीय मदत कक्ष अहेरी विधानसभा प्रमुख, अरुण शेडमाके, अंकुश मंडलवार प्रकाश भाऊ गद्दलवार यांनी वाघेझरी येथे जाऊन मनोज कोवासे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला तसेच आर्थिक मदतही केली. शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात नेहमीच धावून जातात त्यामुळे एखादा दुःखद प्रसंग कार्यकर्त्यावर ओढवला तर त्याच्या अडचणीत धावून जा असा संदेश त्यांनी दिला आहे.
मनोज कोवासे हे शिवसेनेचे सक्रिय व निष्ठावान कार्यकर्ते होते. अतिदुर्गम भागात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. त्यांच्या अकाली निधनाने कोवासे कुटुंबीयांसोबतच शिवसेना पक्षाचीही मोठी हानी झाली असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.मनोज कोवासे यांच्या कुटुंबीयांना या दुःखाच्या प्रसंगी शिवसेना सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना देत त्यांना धीर दिला.यावेळी नामदेव हिचामी नगरसेवक न. पं. एटापल्ली, राघव सुलवावार नगरसेवक न. पं. एटापल्ली, कैलास उसेंडी सरपंच ग्रा. पं. गुरुपल्ली, विश्वनाथ जांभूकर सर, प्रशांत तलांडे, बाळू आत्राम उपसरपंच ग्रा. पं. गुरुपल्ली, नत्तू दुर्वा, रिषभ दुर्गे, महादेव हिरा, मिरवा मट्टामी, सुमित कर्माकर, सचिन गेडाम, सुरेश तलांडे, अमर बिश्वास, वैभव सोमणकर, आदित्य चिपावार आदी बहुसंख्येने उपस्थित होते.


