
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरचीपासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या हूडूकदूमा येथे 26 जून रोजी सायंकाळी सुमारे 3 वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात दुर्दैवी घटना घडली. मोहफुलाच्या झाडावर वीज कोसळून झाडाखाली उभ्या असलेल्या तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत दिनेश जबेलसिंग काटेंगे (रा. हूडूकदूमा) यांची एक जनावर (गोरी) तसेच संतराम धनिराम जाता (रा. हूडूकदूमा) यांची दोन जनावरे (गाय व गोरा) दगावली. या अचानक झालेल्या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने काढलेल्या अंदाजे किंमत गाय 40 हजार रुपये व दोन वासरांची किंमत 20 हजार रुपये नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच बोरी येथील प्रभारी ग्राम महसूल अधिकारी रोहीनी कोटनाके,पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रभान लटाये, सरपंच सावची बोगा, उपसरपंच मीरा काटेंगे तसेच पोलीस पाटील गेंदलाल कमरो यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
या घटनेमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

