
नितेश गट्टीवार गडचिरोली दि ३ मे:
देसाईगंज तालुक्यातील मौजा कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचा भव्य उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला
या प्रसंगी आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरणार असून, स्थानिक उत्पादनाला नवी दिशा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे.

या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीबरोबरच कृषी क्षेत्राचा विकास अधिक वेगाने होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपस्थित धनपाल मिसार सर, उपसरपंच गजानन सेलोटे , अरुण कुंभलवार, ईश्वरी राऊत, दिगंबर धोटे, गोविंदजी बरडे, प्रल्हाद राऊत, संतोष धोटे, देशमुख सर, कुथे सर, शरद धोटे, सुनील पारधी, एकनाथ पत्रे, प्रदीप तुपट, विवेक राऊत, विनायक अलोने, मनोहर राऊत, कैलास डेंगानी, अभि शेंडे, गिताबाई धोटे, शोभा धोटे, निकिता धोटे, प्रमिला राऊत, व शेतकरी बांधव उपस्थित होते.
या उपक्रमासाठी सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

