
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी दि.०३ मे :
समाजकल्याण विभागाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांतर्गत चामोर्शी तालुक्यातील अस्मिता भगवान वाघमारे, प्रीती, सलोनी पिलारे आणि स्टॅलिन कावेरी या विद्यार्थिनींची ‘नवगुरुकुल युनिव्हर्सिटी, पुणे’ येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल समाजकल्याण विभागाचे सचिन मडावी यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला.
पुणे येथील नामांकित नवगुरुकुल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवणे ही या विद्यार्थिनींच्या कष्टाचे आणि जिद्दीचे फळ मानले जात आहे. ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षण क्षेत्रात घेतलेली ही भरारी कौतुकास्पद असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

याप्रसंगी समाजकल्याण विभागाचे सचिन मडावी, परमेश्वर जोगदंडे, प्रतिक हेपटे आणि अनुश्री येलमुले प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे चामोर्शी परिसरातून या विद्यार्थिनींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

