
नागपूर दि. १ २ डिसेम्बर २ ० २ ५
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समता सैनिक दलाच्या परेड ला भेट दिली आणि एसएसडी विषयी उत्सुकतेने माहिती विचारली असता समता सैनिक दलाच्या कार्याची व पथ संचलनाची संपूर्ण माहिती समता सैनिक दलाच्या एड स्मिता कांबळे यांनी दिली . तसेच उपवर्गीकरण क्रेमिलेयर हे संविधान विरोधी कशे आहे ? असे एड स्मिता कांबळे यांनी त्यांना सांगितले .

उपवर्गीकरन करण्यासाठी राज्य सरकारने गठित केलेली अनंत बदर समिती त्वरित रद्द करण्यात यावी आणि क्रिमिलेयर विरोधी करण्यात येत असलेली चर्चा देखील थांबवावी अशी जोरदार मागणी समता सैनिक दलाच्या एड स्मिताताई कांबळे, विश्वास पाटील , आनंद पिल्लेवान , राजेश लांजेवार, टार्झन ढवळे, अरुण भारशंक सहित समस्त दलाच्या सैनिकांनी आज दिक्षाभूमी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली.
या विषयावर एसएसडीच्या शिष्टमंडळाला ना. एकनाथ शिंदे यांनी सविस्तर चर्चेसाठी आमंत्रित केल्याचे कळले आहे.

या प्रसंगी एसएसडी संपादित भारतीय संविधानाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. newsjagar

