
सत्ता असो वा नसो, विकास हेच ध्येय; आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
मुल | न्यूज जागर प्रतिनिधी चेतन कामडे..
विकासाभिमुख नेतृत्व, जनसेवेची अखंड निष्ठा आणि लोकहितासाठी सातत्याने कार्य करणारे आमदार मा. श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात येत . यानिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

सत्ता असो वा नसो, मंत्रीपद असो अथवा विरोधी बाकावर असतानाही विकासकामांचा ध्यास न सोडणारे नेतृत्व म्हणून सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची ओळख आहे. चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, उद्योग, पर्यावरण, वनसंवर्धन आणि रोजगारनिर्मिती अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत विकासाचा ठसा उमटविला आहे.
जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यामुळे शेतकरी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनात त्यांनी विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी, मुल शहरचे शहराध्यक्ष श्री.प्रवीण मोहूर्ले यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि निरंतर जनसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी शुभेच्छा देताना प्रवीण मोहूर्ले म्हणाले,
“विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास,
कर्तृत्वाने उजळविला बल्लारपूर क्षेत्राचा विकासाचा इतिहास.
जनतेच्या विश्वासाचा तुम्ही भक्कम आधार,
प्रगतीच्या वाटेवरील प्रेरणादायी विचार.
संघर्षातून घडले नेतृत्व महान,
सेवेतच दिसतो तुमचा खरा अभिमान.
अखंड लाभो यश, उत्तम आरोग्य आणि मान,
हीच वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना.”
यावेळी कार्यकर्त्यांनीही आमदार मा. श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनकल्याणासाठी सुरू असलेल्या विकासकार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

