
रुपेश सलामे , प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली येथील गोकुळनगर मध्ये सावित्रीबाई फुले शाळेसमोर राहणाऱ्या माया सचिन भानारकर यांच्या घरातील फ्रिजचा खराब होऊन अचानक स्फोट झाला,
झालेल्या स्फोटाचा आवाजाने घरातील सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. दरम्यान, फ्रिजच्या स्फोटामुळे जवळच ठेवलेल्या गॅस सिलेंडरलासुद्धा आग लागली आणि सिलेंडरचाही स्फोट झाल्याने भडका उडाला.
घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचे अग्निशमन अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. त्यानंतर गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

सदर घटनेत घरात ठेवलेले 40 हजार रुपये रोख तसेच सोन्या-चांदीचे दागिने आगीत जळून खाक होऊन भानारकर कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे .

