Ekta Prashant Samarth

नगरपरिषद निवडणूक 2025 च्या रणधुमाळीत काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. एकता प्रशांत समर्थ Ekta Prashant Samarth यांना मिळणारे अभूतपूर्व जनसमर्थन सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः त्यांचे पती प्रशांत समर्थ यांच्या आक्रमक जनसंपर्क मोहिमेमुळे संपूर्ण शहरात समर्थ दांपत्याची जोरदार हवा असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. newsjagar
आज शहराचा असा एकही कोपरा उरलेला नाही, जिथे प्रशांत समर्थ यांच्या कामांची, त्यांच्या जनसंपर्काची आणि एकता समर्थ यांच्या नेतृत्वाच्या चर्चा होत नाहीत. गल्लीपासून चौकापर्यंत, बाजारपेठेपासून वॉर्डापर्यंत एकताचं नाव आणि प्रशांत समर्थ यांचं कार्यकर्तृत्व लोकांच्या ओठांवर आहे. प्रगतशील , शांत आणि कार्याच्या बाबतीत प्रशांत महासागरच असा लोकांच्या लोकांच्या मनातील भावना जाणून तळमळीने कार्य करणारा अशी पप्रशांत ची ओळख आहे .
एकता समर्थ आणि प्रशांत समर्थ यांना सर्व स्तरांतून मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून विरोधक चांगलेच दबावात आले आहेत. पराभवाची भीती विरोधकांना सतत सतावत असून, त्याचे स्पष्ट प्रतिबिंब त्यांच्या हालचालींत दिसून येत आहे. जनतेचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो आहे, हे आता लपून राहिलेलं नाही.
“एक प्रशांत महासागर आहे आणि दुसरा प्रशांत समर्थ” अशी चर्चा शहरभर रंगू लागली असून,
या निवडणुकीत समर्थ लाट सर्व विरोधकांना गाठून टाकेल, अशी ठाम भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. आता या प्रचंड जनसमर्थनाचं रूपांतर 2 डिसेंबरला मतपेटीत कसं होतं, याकडे संपूर्ण मूल शहराचं लक्ष लागून आहे.

