
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
गडचिरोली:-
गडचिरोली येथील सुमानंद सभागृहात प्रशासनाच्या वतीने पेटी वाटप सुरू आहे, मात्र कामगारांना अत्यंत वाईट परिस्थितीत थांबावे लागत असून तीन-तीन दिवस रांगेत उभे राहूनही पेटी मिळत नाही.
कामगारांकडून अपॉइंटमेंट लेटरवर सही आणि शिक्क्यासाठी ठेकेदारांकडून ५० ते १०० रुपयांची उघड वसुली केली जात असल्याचा आरोप समोर आला आहे. न दिल्यास सही-शिक्का देण्यासाठी मुद्दाम टाळाटाळ केली जाते, असा आरोप कामगारांनी केला आहे.

बांधकाम कामगारांच्या पेटी वाटप योजनेत प्रचंड गैरव्यवस्था व शोषण सुरू असल्याचा गंभीर आरोप आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केला आहे.
सभागृहात हजारो कामगार स्त्रिया-मुलांसह थांबलेले दिसले, पिण्याच्या पाण्याची आणि रात्रीच्या मुक्कामाची कोणतीही सुविधा नव्हती.
राज बन्सोड यांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केली आहे की त्यांनी स्वतः सुमानंद सभागृहात जाऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि शोषण करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत.
——-

