
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
कुरखेडा, दि. 12 ऑक्टोबर 2025 —
कुरखेडा आज दिनांक 12 ऑक्टोबर रोजी आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कुरखेडा येथील आयटीआय (ITI) वस्तीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या राहणीमानाची पाहणी केली. या भेटीदरम्यान वस्तीगृहातील बाथरूम, हॉल आणि स्वच्छतेच्या सोयींची अत्यंत दयनीय अवस्था असल्याचे निदर्शनास आले.

या पाहणीमध्ये जिल्हा महासचिव अंकुश कोकोडे, तालुका उपाध्यक्ष लोकेशभाऊ लाडे, तसेच विधानसभा उपाध्यक्ष सोनूभाऊ चौधरी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रत्यक्ष स्थळी समस्या पाहिल्या.
पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन वस्तीगृहातील मूलभूत सुविधा दुरुस्त कराव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच या संदर्भात लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे आता प्रशासनाचे लक्ष वेधले गेल्याने लवकरच सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

