
श्री.नंदकिशोर वैरागडे , विशेष जिल्हा प्रतिनिधी
कोरची.दि.12/10/25
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याझाल्या प्रत्येक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. अशातच दिनांक 11 आक्टोबरला येथील बुद्ध भूमीवर तालुक्यातील बौद्ध समाजाची सभा पार पडली. या सभेत तालुक्यात ज्या आंबेडकरी पक्षाचे प्राबल्य आहे, अशा वंचित बहुजन आघाडी आणि बसपा चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली आणि येणाऱ्या निवडणूकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे ठरविले. याशिवाय समविचारी पक्षांची युती करून निवडणूक लढण्याचे ठरविले. यामुळे तालुक्यात कांग्रेस, भाजप सोबत लढण्यासाठी तिसरी आघाडी तयार होताना दिसत आहे.
आजपर्यंत कोरची पंचायत समितीमध्ये कांग्रेस आणि भाजपाचे वर्चस्व राहिले होते. परंतु दोन्ही पक्षांनी तालुक्यात भरीव कामे केली नाही. त्यामुळे तालुक्यातील मतदार दोन्ही पक्षांवर नाराज आहेत. जर तिसरी आघाडी झाली तर तिघात चुरस होऊ शकते.

