
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
नवोदय विद्यालयाची जुनी इमारत जीर्ण अवस्थेत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित —
जिल्ह्यातील प्रतिनिधित्व करणारे लाडके खासदार व आमदार यांचेसुद्धा दुर्लक्ष.

गडचिरोली, ता. ९ ऑक्टोबर — चामोर्शी तालुक्यातील घोट येथील नवोदय विद्यालयाची जुनी इमारत सध्या पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असून भिंतींना मोठे तडे गेले आहेत, छत गळत आहे आणि खिडक्या-दारे मोडकळीस आले आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकमेव केंद्राची नवोदय विद्यालय म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय घोट हे असून इथे सगळ्या जातीचे,समाजाचे गरीब,श्रीमंत मुले परीक्षा देऊन शिकायला येतात परंतु काही समस्येमुळे मुलांना अडचणी सहन कराव्या लागतात,
पावसाळ्यात हॉस्टेल मध्ये पाणी गळती होत असून विजेच्या तारा ओलसर झाल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. .विद्यालय चे प्राचार्य ममता लांजेवार व उपप्राचार्य गाजबिये यांनी पाठपुरावा करून सुध्दा शासनाचे लक्ष या एकमेव जिल्हयातील नवोदय विद्यालायकडे अजिबात नाही,सतत उपप्राचार्य गाजबिये यांनी जेवढं जमेल तेवढा योगदान त्यांनी या शाळेला दिला परंतु केंद्र शासनाच्या दिरंगायीपणामुळे इथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे,
प्राचार्य व उप प्राचार्य यांनी कार्यालयाकडे वारंवार निवेदने सादर केली आहेत. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “शासनाने आता तरी लक्ष घालावे, अन्यथा एखादा अपघात घडल्यास जबाबदार कोण?” असा प्रश्न पालकांना व तिथल्या प्राचार्य व उपप्राचार्य यांना उपस्थित झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “नवोदय विद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. मात्र जीर्ण अवस्थेतील इमारतीमुळे शिक्षण आणि सुरक्षितता दोन्ही धोक्यात आली आहेत. शासनाने तात्काळ नवीन इमारतीचा प्रस्ताव मंजूर करावा,” अशी मागणी आहे
मात्र, तोपर्यंत विद्यार्थ्यांना धोक्याच्या छायेतच राहावे लागत आहे.नवोदय विद्यालयाची इमारत तब्बल ३८ वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असून तिची स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. भिंतींना मोठे तडे, छप्पर गळती, खिडक्या-दारे मोडकळीस आलेली असून विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे
त्यानंतर आजपर्यंत इमारतीचे नूतनीकरण किंवा दुरुस्तीचे कोणतेही काम करण्यात आलेले नाही. शाळेच्या भिंतींना ओलसरपणा व तडे आल्याने काही वर्गात शिकवणी थांबवावी लागते. पावसाळ्यात छत गळतीमुळे वर्गखोल्या पाण्याने भरतात आणि शिक्षणात मोठा व्यत्यय येतो.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदने दिली आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “तिन्ही दशकांहून अधिक काळ लोटला तरी शासनाने लक्ष दिले नाही, हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे,” अशी भावना पालकांनी व विद्यालयाच्या स्टाफ नी व्यक्त केल आहे.
प्राचार्या व उप प्राचार्या यांनी सांगितले की, “३८ वर्ष जुनी इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. शासनाने तातडीने नवीन इमारत मंजूर करून बांधकामाला सुरुवात करावी. एखादा अपघात झाल्यानंतर जबाबदार कोण ठरणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाकडून या संदर्भात अहवाल तयार करण्याचे आणि शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे काम सुरू असल्याचे समजते. मात्र, तोपर्यंत विध्यार्थी नाईलाजाने तिथेच धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करीत आहे,
नवोदय विद्यालय — गुणवत्तेचे प्रतीक
पाचवीत शिकणारे विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षेसाठी कठोर मेहनत घेतात. निवड झाल्यानंतर त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि निवासी सुविधा दिल्या जातात. अनेक माजी विद्यार्थी आज विविध प्रशासकीय, तांत्रिक आणि व्यावसायिक क्षेत्रात देशभर आपली ओळख निर्माण करत आहेत. नवोदय विद्यालय हे दर्जेदार शिक्षण आणि अनुशासनासाठी ओळखले जाते.
🏚️ पण इमारतीची अवस्था चिंताजनक
सध्या विद्यालयाची मुख्य इमारत पूर्णपणे जीर्णावस्थेत असून, भिंती तडकल्या आहेत, छप्पर गळते आहे आणि वर्गखोल्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. “ही इमारत कधी कोसळेल याची खात्री देता येत नाही,” अशी भावना शिक्षक आणि विद्यार्थ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षणाचे वातावरणही भयभीत झाले आहे.
💰 फक्त ३ कोटींची मंजुरी — बांधकाम शक्य नाही
माजी प्राचार्य राजन सर यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत अंदाजे १३ कोटी रुपयांचा सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे पाठविला होता. तथापि, शासनाने केवळ ३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या अल्प निधीत नवीन इमारत उभारणे किंवा सर्व आवश्यक दुरुस्ती करणे अशक्य आहे.
🚻 तात्पुरती सुविधा उभारण्याचे नियोजन
सध्याच्या प्राचार्या ममता लांजेवार यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन मॉड्युलर प्रसाधनगृह उभारण्याची प्रक्रिया येत्या दोन दिवसांत सुरू केली जाणार आहे.” तसेच, ही गंभीर बाब संसद सदस्य आणि उच्च शिक्षण विभागासमोर प्रत्यक्ष मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
🙏 प्रशासनाकडे मागणी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आणि जीवित सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने तातडीने संपूर्ण नवीन इमारत बांधकामाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी पालक, शिक्षक व स्थानिक नागरिकांकडून होत

