
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
चामोर्शी:-
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावाऔच्या शेतकरी वर्गांच्या स्वमालकीच्या उपजत शेतजमिनीवर शासनाने हस्तक्षेप करीत कुटनिती षडयंत्र रचण्याचा डाव आखला जात आहे.
महसूल विभागाला शासन स्तरावरून परिपत्रक देत संबंधित गावात दंवडी तसेच आदेशान्वये नोटिस सार्वजनिक स्थळावरून प्रसिद्ध करताचं परिसरातील शेतकऱ्यांची जमीन सरकुन झोप उडाली आहे.
सदर गावातील मागील ३० वर्षापासून भोगवट क्रमांक २ मधुन भोग. १ मध्ये परावर्तित करण्यात आलेल्या नोंदीची तपासणी करण्यासाठी सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय चामोर्शी स्तरावरून महसूल विभागीय अधिकारी व कर्मचारी यांची समीती गठीत करण्यात आली.दिनांक:- ०६ /१०/२०२५ पासून वेळापत्रकानुसार सदर समितीच्या कार्यारंभ सुरू झालेला बघून विविध स्तरावरून शेतकऱ्यांची गावागावात बैठका घेत चर्चासत्र सुरू झाले आहेत.

मौजा फोकुर्डी येथुन शेतकरी बैठकीस प्रारंभ करून मोहर्ली, वेलतुर रिठ, येथे शेतकऱ्यांच्या चर्चा सत्रांमध्ये विविध विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला गेला.शेतकऱ्यांचा वैचारिक मनोगत ऐकून , शेतकऱ्यांनी midc ला संपूर्ण विरोध दर्शवला गेला.पुढिल शेतकऱ्यांची रणनीती ठरवण्यात आली.
सदर शेतकऱ्यांच्या सभेला उपस्थित चामोर्शी तालुका कांग्रेस चे अध्यक्ष प्रमोद भगत शेतकरी मौजा घारगाव यांनी शेतकरी सभेला संबोधीत करीत आपले विचार स्पष्ट करुन मायबाप शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रत्येक गावातील प्रथम नागरीक यांनी सभेमध्ये विचार व्यक्त केले. विविध गावातून ग्रामपंचायत चे पदाधिकारी, सभोवतालच्या गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

