
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
गडचिरोली:-
धानोरा तालुक्यातील मुरुंगाव पासून 14 km समोर काटेझरी गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत पूर्णपणे जीर्णावस्थेत पोहोचली असून वर्गखोल्यांच्या छतामधून सतत पाणी गळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात पाणी टाळत शिकावे लागत आहे. काही ठिकाणी भिंतींना तडे गेले असून इमारतीची स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे.

शिक्षक व पालकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या तरी अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी शाळकरी मुलांचे शिक्षण विस्कळीत होत असून पालकांमध्ये संतापाची भावना आहे. आझाद समाज पक्षाचे युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे यांनी भेट देऊन पाहणी केली असता शाळेच्या इमारत जीर्ण अवस्थेत असून भिंत कमजोर झाल्या होत्या,धड मुलांना बसायला व्यवस्था नाही,प्रशासनाचे तसेच ग्रामचयात चे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे
स्थानिक ग्रामस्थांनी शाळेची इमारत तातडीने दुरुस्त करून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा शाळा बंद पाडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला

