
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
चामोर्शी:–
चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत मौजा कान्होली ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी नामे गणपत तिम्माजी कोलते वय ५२ वर्ष, हे चामोर्शी वरुन आज सकाळी १० वाजेच्या सुमारास आपल्या मुख्यालय ग्रामपंचायत कान्होली येथे कर्तव्यावर आपल्या दुचाकी वाहणाने जात असताना विरुद्ध दिशेने मुरखळा वरुन आपल्या स्व:गावी परत जात असलेल्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी व ग्रामविकास अधिकारी कोलते यांच्या दुचाकी मुरखळा माल रस्त्यावर अचानक समोरासमोर येत जबर धडक दिल्याने मोठा अपघात झाला.
सदर अपघात एवढा भयानक होता त्या अपघातात दोन्ही दुचालक कोसळून रस्त्यावर पडले. या अपघातात ग्रामविकास अधिकारी गणपत तिम्माजी कोलते वय ५२ वर्षे यांच्या डोक्याला ,डोळ्यावरील भागात तसेच छातीवर जबर मार बसल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सदर मार्गाने प्रवास करणाऱ्या लोकांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे दाखल करण्यात आले. रूग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात रेफर करण्यात आले.
जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मावळली. शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून मर्ग दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे.
सदर घटनेची माहिती पोलीस विभागाला मिळताच पुढील तपास पोलीस स्टेशन चामोर्शी पोलीस निरीक्षक दीपक डोंब(PI Dipak Domb) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासना अंतर्गत घटनेचा तपास सुरू आहे.

