
सोनू वाळके,जिल्हाप्रतिनिधी.
भाऊचा गरबा महोत्सवात होणार सहभागी मूल (प्रतिनिधी) : स्व. चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समिती मूलच्या वतिने आयोजीत केलेल्या भाऊंचा गरबा महोत्सवात सहभागी होण्यासाठी हास्यजत्रा फ्रेम अभिनेत्री प्राजक्ता माळी हया बुधवारी सायंकाळी 5 वाजता क्रिडा संकुल येथे होणा भाऊंचा गरब्यात सहभागी होणार आहे.
बक्षिसांचा महापुर असलेल्या या भाऊंचा गरबा महोत्सवात हजारो रूपयांचे पुरस्कार ठेवण्यात आलेले आहे. सर्वांसाठी खुला एक गट आणि मूल तालुका व शहरासाठी वेगळा गट ठेवण्यात आलेला आहे. त्यासोबतच गरबा कपल आणि गरबा क्विन यासाठी सुध्दा बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आलेली आहे. यास्पर्धेच्या निमीत्याने हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी या उपस्थित राहुन स्पर्धकांचे मनोबल वाढविणार आहे.
भाऊंचा गरबा महोत्सवात मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुधीर भोयर, सुरज मांदाळे, इंजि. रूपेश निकोडे, राकेश ठाकरे, प्रशांत बोबाटे, वंश बोचाटे, गिर, प्रितेश संगेल, संजिवनी वाघरे, जानवी रणदिवे, सोनिया

मौनाली वीडीवार यांनी केले आहे.

