
ओला दुष्काळ जाहीर करण्याची माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची मुख्यमंत्रींकडे मागणी
गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी झालेल्या सततच्या व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून उदरनिर्वाहाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करून गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांच्या पिकांवर आलेल्या संकटामुळे तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. शासनाने त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी.” यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम आदी उपस्थित होते.
शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

