
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
जिल्ह्यातील काही शासकीय विभागांकडून म्हणजे तहसील, पोलीस विभाग,जिल्हापरिषद, आरोग्य खाते,इत्यादी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलेली वाहने खाजगी व घरगुती कामासाठी वापरली जात असल्याचे समोर आले आहे. ही वाहने शासकीय कामकाजासाठी राखून ठेवण्यात आली असली तरी अनेकदा ती बाजारहाट, शाळा–कॉलेजला मुलांना सोडणे, नातेवाईकांना आणणे–नेणे , सहल,अशा वैयक्तिक कारणांसाठी वापरली जात असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले.
करदात्यांच्या पैशातून इंधन, देखभाल व वाहनचालकांचा पगार यावर खर्च होतो. त्यामुळे अशा गैरवापरामुळे सार्वजनिक निधीवर मोठा बोजा येतो. वाहनांच्या गैरवापराबाबत तक्रारी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाकडे आहेत. मात्र अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाहीत.

नागरिकांच्या मते, “शासकीय साधनसंपत्तीचा योग्य उपयोग झाला पाहिजे. खाजगी कारणांसाठी वाहने वापरणे हा जनतेशी अन्याय आहे.”

