
सोनू वाळके,जिल्हाप्रतिनिधी.
चंद्रपूर:-
सावली ते हरांबा गावातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत चालल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) बससेवा कमी केल्याने शाळकरी मुलांना शाळेत ये जा करण्यास अडचण निर्माण होत आहे तरी प्रशासनाचे याकडे अजिबात लक्ष नाही. या निर्णयामुळे रोज शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊन त्यांना शिक्षणापासून वंचित रहावं लागत आहे,

दररोज अनेक किलोमीटर पायी चालत शाळेत जावे लागते, त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालक व स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आज सकाळी शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांनी “आम्हाला बस सेवा हवीच” रस्ता झालाच पाहिजे “अशा घोषणा देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला.लहान शाळकरी मुलांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागावर न्यायासाठी मोर्चा काढला आणि
बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.

