
सावली:- तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि विकासकामातील विविध अडथळे यावर तोडगा काढण्यासाठी आज सावली येथील गोसीखुर्द विश्रामगृह येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली.
या बैठकीत नायब तहसीलदार मडावी साहेब, वनविभागाचे RFO विनोद धुर्वे साहेब, कृषी विभागाचे ललित राऊत साहेब, PWD चे उपविभागीय अधिकारी अभियंता दडमल साहेब, अभियंता राऊत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजयजी नैताम साहेब,क्षेत्र सहायक सिडाम उपस्थित होते. तसेच राज्य परिषदेचे सदस्य कादर शेख, जि.प. माजी बांधकाम सभापती संतोषभाऊ तंगडपल्लीवार, भाजपा तालुका अध्यक्ष किशोर वाकुडकर, तालुका महामंत्री सतिश बोम्मावार, सचिन तंगडपल्लीवार, जेष्ठ नेते देवराव मुद्दमवार, प्रकाश गड्डमवार, देविदास बानबले, अर्जुन भोयर, अरुण पाल, कविंद्र रोहनकर, मोतीराम चिमुरकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष नितिन कारडे, सरपंच मोहन चन्नावार, छायाताई शेंडे, रविंद्र बोल्लीवार, जितु धात्रक, डॉ. गंगाधर धारने, पुनम झाडे, नामदेवराव भोयर, छाया चकबडलवार, मनिषा चिमुरकर, प्रतिभा बोबाटे, शोभा बाबनवाडे, गुरु भुरसे, बबन बोलसरे, लोकनाथ रायपूरे, राजु धोटे, जितु सोनटक्के, सुरज किनेकर, विशाल करंडे, नरेश बाबनवाडे, धनराज गुरुनुले, किशोर खेडेकर, कोंडया बोदलकर यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी घेतलेल्या आढाव्यातील महत्त्वाचे मुद्दे*
*कृषी विभाग* ई-पीक नोंदणी, खतांचा तुटवडा आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीत होत असलेल्या विलंबाबाबत शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. कृषी अधिकारी राऊत साहेबांना शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या. *वनविभाग* तालुक्यात अंदाजे पंचवीस वाघ असून, त्यामुळे निर्माण होणाऱ्या भीतीबाबत ग्रामस्थांच्या चिंता व्यक्त करण्यात आल्या. वन्य हिंस्त्र प्राणी व मानवी संघर्ष रोखण्यासाठी आणि नुकसान भरपाईसाठी वनविभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे डॉ. नेते यांनी सांगितले. *बांधकाम विभाग* PWD विभागाकडे रस्त्यांची बिकट अवस्था, मोठमोठे खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात या मुद्द्यावर कडक शब्दांत चर्चा झाली. रस्त्यांमुळे गाड्या खराब होणे आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल जनतेचा संताप व्यक्त झाला. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना अभियंता राऊत साहेबांना देण्यात आल्या.
*पंचायत समिती – घरकुल योजना* गटविकास अधिकारी नैताम साहेबांकडे घरकुल योजनेतील प्रलंबित प्रकरणे व अपूर्ण घरकुलांची माहिती घेण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी पंचायत समितीने ठोस पावले उचलण्याची मागणी झाली.
तहसीलदाराच्या भूमिकेवर भर
या बैठकीत तहसीलदार हा तालुक्याच्या कारभाराचा केंद्रबिंदू असल्याचे अधोरेखित करण्यात आले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तहसीलदारांनी पुढाकार घेतला पाहिजे. तालुक्यातील प्रत्येक अडचण थेट तहसील कार्यालयापर्यंत पोहोचते, त्यामुळे त्या तातडीने सोडविणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे डॉ. नेते यांनी स्पष्ट केले.

बैठकीतून अधिकारी वर्गास ठाम संदेश देण्यात आला की सावली तालुक्यातील जनतेच्या समस्या डावलल्या जाणार नाहीत. अधिकारी वर्गाने जबाबदारीने काम केले तरच नागरिकांना न्याय मिळेल.अशा ही सुचना मा.खा.डॉ. नेते यांनी या आढावा बैठकीतदिल्या. . या प्रसंगी मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करत म्हणाले दि.१७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक मंडलावर सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित करत यशस्वी करावे असे ही अवाहन मा.खा.डॉ. नेते यांनी यावेळी व्यक्त केले.

