
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
‘
गडचिरोली : गेल्या तीन दशकांपासून गडचिरोली

जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध मार्गाने दारूची विक्री सुरू आहे. या विरोधात अतिदुर्गम मन्नेराजाराम गावाने दारूबंदीच्या दिशेने ठोस पाऊल टाकत ग्रामसभेत महत्त्वाचा ठराव पारित केला.असून यात गावाकऱ्यांना अवैध दारू विक्रेत्यांच्या अंत्यसंस्कारातही सहभागी होऊ नका, असे आवाहन करण्यात आले. मुक्तिपथ गाव संघटना, ग्रामपंचायत, पेसा ग्रामसभा, पोलीस विभाग, गोटुल समिती, मुक्तिपथ-शक्तिपथ महिला संघटना, युवक संघटना तसेच शेजारच्या येचली आणि बामनपल्ली गावातील पदाधिकारी यांच्या संयुक्त पुढाकारातून सगळ्यांच्या संगमताने हा ठराव घेण्यात आला

