
नितेश गट्टीवार |जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली (चामोर्शी), दि. २ ऑक्टोबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष क्र. २, चामोर्शी येथे दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचे स्मरण केले.
सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि सामाजिक एकोपा यांचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या विचारांना उजाळा देतानाच, ‘जय जवान, जय किसान’ हा देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश देणारे लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचेही स्मरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष कविता किरमे, भाजयुमो जिल्हा सचिव नरेश अलसावार, भारत धोडरे, कौशल्य बुरांडे, मनिषा बोधनवार, विनोद किरमे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहित आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

