
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : भाजपा युवा मोर्चाचे तालुका महामंत्री अक्षय (बंटी) उपासे यांचा काही दिवसांपूर्वी अपघात होऊन त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या ते घरी उपचार घेत आहेत.
या पार्श्वभूमीवर आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी अक्षय उपासे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्यांनी अपघातामुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत अक्षय उपासे तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

अक्षय उपासे यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, त्यांनी या संकटातून लवकर सावरावे आणि पुन्हा पूर्वीप्रमाणे उत्साहाने आपल्या सहकाऱ्यांसोबत सामाजिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय व्हावे, अशी सदिच्छा आ. नरोटे यांनी व्यक्त केली.
या भेटीमुळे अक्षय उपासे व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार मिळाला. कार्यकर्त्याच्या अडचणीच्या काळात पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी दिलेला हा आधार महत्त्वपूर्ण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे रत्नदीप पाटील म्हशाखेत्री, सुजित राऊत, विलास खेवले, लोमेश कोलते, सुदर्शन धानोरकर, धनराज पोटे, संतोष चिंचोलकर, भोजराज भोयर, महेश कोटारे, घनशाम गोहने, राजेंद्र राऊत, रवी सेलोटे, शामराव सालोटकर, धनराज कोलते, हिवराज राऊत, रामकृष्ण बोरुले यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

