
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशातून अदानी सिमेंट यांच्या पुढाकारातून ग्रामीण रुग्णालय, कोरची येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. जीवन वाचवण्याच्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.
विशेष म्हणजे, अदानी सिमेंट तर्फे प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले, त्यामुळे रक्तदात्यांचा उत्साह अधिक वाढलेला दिसून आला.

कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सदरुद्दीन भामानी, डॉ. कृणाल सरदारे, मिथून मोडक, निनाद फुंडे, डॉ. सचिन बरडे, राहूल सिडाम, प्रफुल्ल राऊत, वैजनाथ पोते, शरद बांबोडे, बंडू कुंभारे, निकेश भालेराव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी विनायक लिंगायत, मनोज सारवा, नीलकंठ मडावी, हिमांशू सोनटक्के, शिवा कोरेटी, रवींद्र अटेला, पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, मनोज अग्रवाल, सूरज हेमके, आशिष अग्रवाल, दिनेश बोरकुटे, रवींद्र बावणे, विशाल जांभुळकर, आकाश हिडामी, हेमराज दरों, फिरोज सोनकुकरा, एस. बी. चकाते, ए. एस. पिसे, हेमलाल देवांगन, आर. बी. सहारे, आर. बी. बावणे, नामदेव नागपुरे, विनोद गडपायले, के. एम. सूर्यवंशी आणि मिथून मोडक यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले असून, “रक्तदान करा – जीवनदान द्या” असा संदेश देण्यात आला.

