
काटोल
ज्येष्ठांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक मंडळ काटोल द्वारा सातत्याने आरोग्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
दिनांक 10 डिसेंबर 2025 ला नियमित मासिक सभेची सुरुवात खरा तो एकची धर्म या समूह गीताने करून दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मागील सभेचे कार्यवृत्त वाचन करून 38 ज्येष्ठांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसा प्रित्यर्थ ज्येष्ठ पुरुषांना दुपट्टा तर महिलांना स्कार्फ देण्यात आला.
नागपूर येथील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अजिज खान,यांचे क्रिसेंट हॉस्पिटल नागपूर येथील वैद्यकीय चमू डॉक्टर संदीप पाल, त्यांचे सहकारी आशिष हींगवे व इतर सहकर्मी यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या शिबिरात एकूण 80 ज्येष्ठांची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ब्लड शुगर, बीपी, पल्स रेट, एसपीओटी ही तपासणी करून आजाराचे निदान करण्यात आले . त्याशिवाय ज्यांना आवश्यकता आहे, अशा ज्येष्ठांची इसीजी करून त्यांना पुढील उपचाराबाबत सल्ला देण्यात आला.
आरोग्य शिबिर आयोजित करण्यात रुग्णालयाचे श्री आशिष हिंगवे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याशिवाय कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष श्री गजाननराव भोयर ,उपाध्यक्ष सूर्याजी राऊत, सचिव अशोकराव काकडे, सहसचिव वसंतराव खवसे, संघटन सचिव हिरामणजी सकर्डे आणि कोषाध्यक्ष श्री सदानंद ठाकरे, संचालिका श्रीमती बेबीताई रोडे,याशिवाय सर्व पदाधिकारी व सभासदांचे विशेष सहकार्य लाभले.


