
गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार बाबुरावजी मडावी यांची जयंती साजरी
गडचिरोली:-आज दि. २७ नोव्हेंबर २०२५ ला आदिवासी परधान समाज मंडळ,गडचिरोलीच्या वास्तूमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार, माजी राज्यमंत्री स्व. बाबुरावजी मडावी साहेब यांची जयंती समाज बांधवांच्या उपस्थित उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम समाजाचे प्रेरणास्थान, जिल्हयाचे शिल्पकार तथा माजी राज्यमंत्री स्व. बाबुरावजी मडावी साहेब यांच्या प्रतिमांना आदिवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी, समाज मंडळाचे युवा सदस्य महेंद्र मसराम,विजय सुरपाम, अंकित कुळमेथे, अवि शेंडे, विवेक वाकडे,रुपेश सलामे मिडिया जिल्हाप्रमुख,अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, गडचिरोली यांच्या हस्ते पुष्हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. व उपस्थितांनी स्व. बाबुरावजी मडावी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकले.
या प्रसंगी अजय सुरपाम,राज डोंगरे,आकाश कुळमेथे,महादेव कांबळे, नितीन शेडमाके,रोहित आत्राम, साहिल शेडमाके, साहिल गोवर्धन, वैभव रामटेके यांच्यासह परिसरातील इतर नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अंकित कुळमेथे यांनी केले तर आभार रुपेश सलामे यांनी मानले.


