
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
चामोर्शी:-
– तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग बारावीच्या 3 विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे.
यामध्ये
अंडर 19 वयोगटात 800 मिटर दौड स्पर्धेत वर्ग 12वी ची विद्यार्थिनी कु. सलोनी डोमाजी किरमे ने प्रथम क्रमांक पटकावला व
अंडर 19 वयोगटात 3000 मिटर दौड स्पर्धेत वर्ग 12वी ची विद्यार्थिनी कु. साजन सुखदेव कोमावार हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
तर
अंडर 19 वयोगटात 400 मिटर दौड स्पर्धेत वर्ग 12वी ची विद्यार्थिनी कु. राणी प्रवीण कुळमेथे हिने द्वितीय क्रमांक मिळविला तसेच नयना चावरे हिने तृतीय क्रमांक मिळविला
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. सर्वांच्या निवडी बद्दल राहुल लोक विकास मंडळाच्या अध्यक्षा कौशल्या सहारे, सचिव विवेक सहारे , कोषाध्यक्ष वक्टुजी उंदिरवाडे , सदस्या रेखा साखरे , माणिक साखरे , प्राचार्य शाम रामटेके, तसेच जेष्ठ शिक्षक राजू धोडरे, गुरुदेव सातपुते, निलेश क्षीरसागर ,लोकनाथ दुधबळे, सरिता आखाडे, जयश्री कोठारे ,
प्रा. प्रेमानंद वालदे , प्रा. प्रदीप भांडेकर, प्रा. प्रवीण गव्हारे , , लक्ष्मण गव्हारे,
यांनी प्रदीप भांडेकर आणि क्रिडा शिक्षक प्रविण नैताम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .


