
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
चामोर्शी मुलं मार्गावरील जडवाहतूक पर्यायी मार्गाने वळती करा
जड वाहन धारकाकडून जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला दिली तिलांजली.

चामोर्शी पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष.
चामोर्शी तालुक्यातील हरणघाट ते चामोर्शी रस्ता चंद्रपूर, नागपूर तसेच इतरत्र कुठेही जाण्यासाठी वाहनधारकांना जवळचा आहे. मात्र हा रस्ता गेल्या काही वर्षांपासून खड्डेमय झाला आहे. त्यासाठी या रस्त्याची नव्याने बांधणी करावी म्हणून शासनाकडे सतत मागणी केली जात होती. त्याची दखल घेत शासनाने रस्ता बांधकामाची मान्यता दिली आहे. आणि या एकूण 15 किमी च्या रस्त्यापैकी सात ते आठ किमी चा रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले. पण सूरजागढ प्रकल्पाच्या अतिजड वाहनाने या रस्त्याचे फक्त तीन महिन्याच तीनतेरा वाजवले. त्यामुळे सदर कंत्राटदारानी निकृष्ट दर्जाचे कामं केली की काय असा प्रश्न चिन्ह नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहॆ.रोज शेकडो अतिजड वाहने या रस्त्याने जात असल्याने हा संपूर्ण रस्ता फुटून गेला आहॆ.त्यामुळे पुन्हा एकदा या रस्त्यांची डागडुजी करण्यात आली पण या मार्गावरील जडवाहतूक बंद केली तरच हा रस्ता टिकेल अन्यथा नाही त्यामुळे या मार्गावरची जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळती करावी,अशी मागणी भेंडाळा परिसरातील नागरिकांनी केली होती.परंतु आज या रस्त्याची हालत रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी झाली आहे.
जिल्हाधिकारी च्या आदेशाची पायमल्ली
मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे आदेश क्र. काया –2 अका. दंडा/ कावि 227/2024 दि. 01/02/2025 अन्वये पुढील आदेशा पर्यंत जडवाहतुकीस मज्जाव /बंदी असेल. सदर वाहतूक पर्यायी मार्ग आष्टी ,चामोर्शी , गडचिरोली मुलं मार्गे करण्यात यावी. अश्या नावाचे फलक फेब्रु. महिन्यात चामोर्शी येथील आष्टी टी पॉईंट मधील मुल रस्त्यावर लावलेले आहे,. त्यावेळेस रस्त्याचे कामं सुरू होते म्हणून असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. पण हा आदेश पुढील आदेशापर्यंत असल्याने अजूनही हा रस्त्यावर जड वाहनांना बंदी आहॆ तरीपण गेल्या तीन महिन्यांपासून अतिजड वाहनांचा हा मार्गावर सर्रास ये जा सुरू आहॆ. तरीसुद्धा प्रशासनाचे याकडे लक्ष नाही,सऱ्यास नियम भंग करून कायद्याच्याची पायमल्ली होताना दिसत आहे,त्यात पोलीस प्रशासन सुद्धा कायद्याचे व नियमाचे रक्षण न करता डोळे उघळे ठेऊन काणाडोळा करत आहेत,त्यामुळे मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची या ठिकाणी पायमल्ली होतांना दिसत आहॆ.
पण या रस्त्यावर पदोपदी खड्डे असल्याने हे रस्ते प्रवाश्यांना गचके देत असतात. या रस्त्यावरून जात असताना अनेकांना कमरेचे आजार , मणक्याचे आजार सुध्दा जडलेले आहेत.तरीसुद्धा प्रशासन पाऊल उचलत नाही आहे. प्रशासन काय पाऊल उचलेल याकडे नागरिकांचे लक्ष्य लागले आहे.

