
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
IPS अंजना कृष्णा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री DCM अजित पवार यांच्यात संभाषण घडवून आणणारा बाबाराजे जगताप प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. IPS अंजना कृष्णा यांच्यासोबत व्हिडीओ कॉल आणि व्हॉईस कॉलद्वारे झालेल्या संभाषणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. मुरूम उत्खननाच्या प्रकरणात कारवाईस गेलेल्या करमाळा तालुक्याच्या पोलीस उपअधीक्षक तथा IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना ‘मुरूम उत्खनन वैध आहे’, असं सांगत सरकारी कामात अडथळा आणला आणि थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं त्यांच्याशी कॉलवर संभाषण घडवून आणलं
‘मैं DCM बोल रहा हूं…मैं तुमपे अॅक्शन लूंगा’

अजित पवार यांनी ‘ताबडतोब कारवाई थांबवा, मैं DCM बोल रहा हूं…मैं तुमपे अॅक्शन लूंगा’, अशा भाषेत बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे प्रकरण राज्यात चर्चेत आल्यानंतर माढा तालुक्याचा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष बाबाराजे जगताप याचा आता एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बाबाराजे जगताप हा राष्ट्रवादीचा कार्यकर्त्याचा नशा करतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. त्यामुळे जगताप याच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात अवैध मुरू उत्खनन सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि तलाठी गेले होते. पण, काही लोक काठ्या घेऊन आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी करण्यास सुरूवात केली. माहिती मिळताच करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा या पथकासह तिथे गेल्या. त्यानंतर अजित पवारांनी त्यांना कारवाई थांबवा म्हणून सांगितले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी स्वतः शनिवारी कुर्डू गावात जाऊन पत्रकार परिषद घेऊन, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बाजू घेत पाठराखण केली होती. उलट त्या आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून बोलले आवाज कळत नाहीय का? अशा भाषेत त्यांनी टीका केली होती. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संघ लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून चौकशीची मागणी केली होती. त्यांनतर अमोल मिटकरी यांनी दिलगिरी व्यक्त करत बिनशर्त माघार घेतली आहे. आता उमेश पाटील माघार घेणार का? असा प्रश्न पडला आहे.
करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि वादाला तोंड फुटलं. अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करू नका असं सांगताना अजित पवारांनी अंजली कृष्णा यांनाही दम दिला. अजित पवारांवर यामुळे टीकेची झोड उठली असून, अंजली दमानिया यांनीही संताप व्यक्त केला. अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
. अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करू नका असं सांगताना अजित पवारांनी अंजली कृष्णा यांनाही दम दिला. अजित पवारांवर यामुळे टीकेची झोड उठली असून, अंजली दमानिया यांनीही संताप व्यक्त केला. अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

