
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
गोविंदगाव/ता.अहेरी दिनांक 05.09.25 –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांची जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आझाद समाज पार्टी युवा आघाडी व पालकांनी एकत्र येऊन आज गटविकास अधिकारी (BDO) यांना लेखी नेवेदन सादर केले.
नेवेदनात म्हटले आहे की, शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी असून वर्ग नियमितपणे भरत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर परिणाम होत आहे. ग्रामीण भागातील मुलांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येत असल्याबद्दल पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे यांनी सांगितले की, “गावातील लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, म्हणून आम्ही प्रशासनाकडे तातडीने शिक्षक नेमणुकीची मागणी केली आहे.”
जर या गोष्टीची प्रशासनाने त्वरित कारवाई करून शाळेत शिक्षक नेमणूक केली नहीं, तर पुढील काळात मोठे आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशाराही आझाद समाज पार्टी युवा जिल्हाधक्ष यांनी दिला आहे .
निवेदन देताना युवा जिल्हाधक्ष विवेक खोब्रागडे,जिल्हासचिव प्रकाश बनसोड , गडचिरोली युवा तालुका अध्यक्ष नितेश वेस्ककडे,नाशिकांत भसारकर
अमर चालूरकर, रामटेके व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

