
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
चामोर्शी :-
चामोर्शी येथील वार्ड क्र 17 मध्ये श्री वेनुदास तुरे यांच्या घरासमोर पावसाच्या पाण्यामुळे सिमेंट रोड वर डोब काळ साचलेले असून तिथल्या नागरिकांना ये जा करण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे,या समस्येकडे प्रतिनिधी(वॉर्ड मेंबर) कधी ढुंकून सुद्धा पाहत नाही,अशी प्रतिक्रिया वेनुदास तुरे यांनी न्युज जागर ला आज दिली,

घरासमोर नालीची व्यवस्था नसल्यामुळे पावसाचे किंवा घरातील वापरलेले पाणी थेट रस्त्यावर येते आणि तिथे डबके साचते. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या आणि वाहतुकीच्या अडचणी येतात. रस्त्याच्या मधोमध MSEB चा खांब आलेला असून ये जा करायला अडचण निर्माण होत आहे परंत नगरसेवक आणि संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे,गावातील किंवा परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे नालीची मागणी केली आहे, मात्र अद्याप योग्य उपाय झालेले नाहीत.
असे पाणी डासांचे प्रमाण वाढवते, , म्हणून लवकरात लवकर नालीची उभारणीची मागणी केली जात आहे.
चामोर्शी येथील वार्ड क्र 17 मधील वार्डात श्री वेनुदास तुरे यांच्या घराजवळ रस्त्यावर नाली नसल्यामुळे पावसाचे व घरातील वापरलेले पाणी थेट रस्त्यावर साचले आहे. यामुळे मोठी डबकी तयार झाली असून, नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.”
“स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, प्रशासन व नगर सेवक वेळेत लक्ष दिले नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, उकिरडा वाढला आहे.”
त्या वस्तीत सध्या नाल्याची सोय नाही त्यामुळे पावसाचे साचलेले पाणी हे रस्त्यावर येत आहे व तिथे राहणाऱ्या लोकांना हा त्रास सहन करावा लागत आहे, या जमा असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे, साधी वाहने आपल्या घरासमोर पार्किंग करू शकत नाही ही समस्या आहे, तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष्य देऊन यावर उपाय योजना करावे अशी मागणी होत आहे.
NEWS JAGAR (आवाज सत्याचा)

