
पदवीधर मतदारांशी थेट संवाद; भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी पॉम्पलेटचे वाटप

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.११ ऑक्टोबर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे जोरदार आवाहन भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. पदवीधर मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत त्यांनी भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचाराला गती दिली.

पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या समर्थनार्थ पॉम्पलेटचे वाटप करण्यात आले. तसेच पदवीधर मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून भाजपाला पाठिंबा देत सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.पदवीधर मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका आणि उमेदवाराचा संदेश पोहोचविण्यावर भर
निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवून देण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने सक्रियपणे काम करणे आवश्यक असल्याचे डॉ. होळी यांनी अधोरेखित केले. पदवीधर मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे आणि उमेदवाराच्या विजयासाठी संघटितपणे प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने प्रयत्नशील असून, पदवीधर मतदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रत्यक्ष जनसंपर्कावर भर दिला जात आहे. या प्रचाराच्या माध्यमातून सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात

