
सणासुदीच्या खरेदीसाठी एकाच छताखाली विविध आकर्षक वस्तूंची पर्वणी; ८ व ९ ऑक्टोबरला प्रदर्शन

नितेश गट्टीवार
गडचिरोली | दि. ८ ऑक्टोबर :

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ग्राहकांसाठी विविध फॅशन व लाइफस्टाइल वस्तूंची आकर्षक मेजवानी उपलब्ध झाली असून, हॉटेल लँडमार्क येथे आयोजित ‘वेदा फॅशन व लाइफस्टाइल’ प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तथा गडचिरोली नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका योगिताताई पिपरे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
‘Shop : Explore : Celebrate’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात फॅशन, लाइफस्टाइल आणि सणासुदीच्या खरेदीशी संबंधित विविध आकर्षक वस्तूंचे स्टॉल्स ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांसह कुटुंबातील सर्वच सदस्यांना आपल्या आवडीच्या वस्तूंची खरेदी एकाच ठिकाणी करण्याची संधी मिळणार आहे.
हे प्रदर्शन दि. ८ व ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. सणासुदीच्या खरेदीची लगबग सुरू असताना विविध प्रकारच्या वस्तू एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने गडचिरोलीकरांसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे.
उद्घाटनप्रसंगी कु. वैष्णवी दखणे, रजनी जंगमवार, रोशनी बानणारे, कु. दर्शिता पिपरे यांच्यासह आयोजक व नागरिक उपस्थित होते.
दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाला गडचिरोलीकरांनी भेट देऊन विविध वस्तूंची खरेदी व प्रदर्शनाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

