
लोहारा येथे INTUC-F चे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न
कामगारांच्या हक्कांसाठी संघटनात्मक बळकटीकरणाचा निर्धार; देशभरातील पदाधिकारी व कामगार प्रतिनिधींची मोठी उपस्थिती

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी! Chetan kamde
चंद्रपूर-लोहारा, : कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनात्मक ताकद अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करत भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महासंघ (INTUC-F – Indian National Trades Union Congress Federation) चे राष्ट्रीय अधिवेशन २ ऑक्टोबर ला लोहारा येथील एस. एस. किंगडम येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीने अधिवेशनाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हौशीलाप्रसाद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ॲड. शैतानसिंग सोलंकी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अवनीश त्यागी यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनात कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर मंथन करण्यात आले. किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, रोजगाराच्या संधी, कामगार कल्याण, असंघटित व कंत्राटी कामगारांचे प्रश्न आणि कामगारांचे कायदेशीर हक्क या विषयांवर विशेष चर्चा झाली.
कामगारांच्या प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडून ते शासन व प्रशासनाच्या स्तरावर प्रभावीपणे मांडण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. कामगारांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, अधिकाधिक कामगारांना संघटनेच्या माध्यमातून एकत्र आणणे आणि कामगार कल्याणासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
देशभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.
‘चंद्रपूर जिल्हा – महाराष्ट्र’ या बॅनरखाली झालेल्या या राष्ट्रीय अधिवेशनाला विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. पंजाब-चंदीगडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. मनोहर सिंग, छत्तीसगड प्रदेश अध्यक्ष श्री. मुखवन कश्यप, छत्तीसगड महिला प्रदेश अध्यक्ष श्रीमती संतबाई उईके, झारखंड महिला प्रदेश अध्यक्ष श्रीमती जयंती दास, हिमाचल प्रदेश अध्यक्ष श्री. नरेंद्र कुमार, मध्य प्रदेश अध्यक्ष श्री. कैलास गोयल, गुजरात प्रदेश अध्यक्ष श्री. भाटिया एम.डी. अफझल अनिस, तेलंगणा प्रदेश अध्यक्ष श्री. रामकृष्ण रेड्डी, दिऊ-दमन प्रदेश अध्यक्ष श्री. प्रदेशकुमार महावंशी, उत्तराखंडचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अवनीश त्यागी, राजस्थानचे श्री. शैतानसिंग सोलंकी आणि हिमाचल प्रदेशचे श्री. विजेंद्र ठाकूर यांच्यासह विविध राज्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग.
महाराष्ट्रातून प्रदेश महासचिव डॉ. विनायक पावसकर, अकोला जिल्हाध्यक्ष तथा अमरावती विभाग प्रभारी श्री. पद्माकर वासनिक, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. ताजुद्दीन साहेबजी खतीब, वाशिम जिल्हाध्यक्ष श्री. संदीप धोटे, वर्धा जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत गहूकर, वाशिम जिल्हा MIDC विभागीय अध्यक्ष श्री. उमेश राठोड, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष श्रीमती सुवर्ण माने, प्रदेश कार्यकारी युवा अध्यक्ष श्री. प्रतीक पवार आणि जत तालुका युवा अध्यक्ष श्री. रोहित कुंभार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
चंद्रपूर जिल्ह्यातून श्री. चेतन कामडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रफुल वज्जलवार, जिल्हा सचिव श्री. सौरभ वाढई, गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष श्री. दुर्वास कडस्कर, चंद्रपूर जिल्हा सहसचिव श्री. सतीश सुंकरवार, चंद्रपूर जिल्हा सहसचिव श्री. निकेश सुखदेवे आणि चंद्रपूर जिल्हा सोशल मीडिया. श्री. किरण पोरेड्डीवार मूल तालुका अध्यक्ष, श्री. अनिल कुंटावार, तालुका उपाध्यक्ष श्री. प्रशांत झुरमुरे, तालुका सचिव श्री. आकाश ठाकरे, मूल शहर अध्यक्ष श्री. साईनाथ जिडगेलवार, मूल शहर उपाध्यक्ष श्री. फुलचंदजी गोंगले सर, मूल शहर सचिव श्री. अनिल निकोडे, मूल शहर सहसचिव श्री. विनोद कडस्कर आणि मूल तालुका सभासद श्री. हरीश गोविंदवार यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात संघटन विस्ताराचा निर्धार..
श्री. दत्तात्रय समर्थ यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्यात INTUC-F च्या संघटनात्मक कार्याला अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूप देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कामगारांच्या समस्या केवळ मांडण्यापुरत्या मर्यादित न ठेवता त्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
अधिवेशनाच्या माध्यमातून संघटनेच्या आगामी कार्याची दिशा, संघटन विस्तार आणि विविध क्षेत्रातील कामगारांना संघटित करण्याच्या रणनीतीवरही चर्चा करण्यात आली. देशभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे लोहारा येथे झालेल्या या राष्ट्रीय अधिवेशनाला कामगार संघटनात्मक चळवळीच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले.
#INTUC_Federation #INTUC #LabourRights #Chandrapur #Lohara

