SSD morcha

नागपूर : एससी, एसटी प्रवर्गात उपवर्गीकरण करू नये तसेच क्रिमिलेयर लागू करू नका, यांसह विविध मागण्यांसाठी समता सैनिक दलाच्या वतीने विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात सहभागी नागरिकांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करून शासनाचे लक्ष वेधून घेतले.
समता सैनिक दलाने विश्वास पाटील Vishvas Patil , अॅड. स्मिता कांबळे Adv.Smita Kambale, अॅड. आकाश मून Adv.Akash Moon , राजेश लांजेवार Rajesh Lanjewar , राज सुखदेवे Raj Sukhdeve, आनंद पिल्लेवान Aanand Pillewan, अरुण भारशंख Arun Bharshankh यांच्या नेतृत्वाखाली यशवंत स्टेडियम येथून काढलेल्या मोर्चाला पोलिसांनी मॉरेस कॉलेज टी पॉइंट येथे अडविले.
सदर मोर्चाद्वारे एससी, एसटी प्रवर्गात उपवर्गीकरण व क्रिमी लेयर लागू करू नये, एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठांची स्थापना करावी, खासगी संस्थांमध्ये आरक्षण लागू करावे, एससी, एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे विशेष न्यायालयांची स्थापना करावी. एससी, एसटी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची मर्यादा आठ लाखांहून १५ लाख करावी, इत्यादी मागणीसाठी काढण्यात आला.
मोर्चातील नागरिकांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज बुलंद करीत जोरदार नारेबाजी केली. त्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. सामाजिक न्याय मंत्र्यांनी मागण्यांबाबत लवकरच मुंबईमध्ये बैठक बोलावून योग्य ते निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला. newsjagar
मोर्चा मागे घेण्यात आला असला तरी गेल्या वर्षभरापासून उपवर्गीकरण निर्णयाविरोधात समता सैनिक दल अखंड आणि सातत्यपूर्ण लढा देत आहे.
सुप्रीम कोर्टातील न्यायालयीन लढाई असो, जनतेचे हजारो पोस्टकार्डद्वारे अभिप्राय असोत, आणि ह्या निर्णयात आर्टिकल 341 चे उघड उल्लंघन सुप्रीम कोर्ट ने (Contempt of Constitution) केले आहे, याविरोधात आयोजित केलेली भरगच्च अशी आर्टिकल 341 परिषद , प्रत्येक पातळीवर समता सैनिक दल न्यायासाठी उभे असल्याचे समता सैनिक दलाच्या अॅड. स्मिता कांबळे यांनी सांगितले आहे.


