Three cubs arrested along with tigress..

वनपरिक्षेत्र अधिकारी धुर्वे यांची धडक कार्यवाही:
परिसरातील जनतेने मानले आभार:
सावली:- (न्युज जागर) :
सावली:- दिनांक ९
नोव्हेंबर २०२५ रोजी सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपक्षेत्र व उमरी नियतक्षेत्रात असलेल्या मौजा डोनाडा व गवारला येथील जंगलात मागील एक वर्षापासून F-४ वाघीण व १८-२० महिने वयाच्या तिच्या चार बछड्यांचा धुमाकुळ सुरू होता.
सध्या तालुक्यात धान कापणीचे हंगाम सुरु असून सदरचे वाघांना पकडण्यासाठी दिवसेंदिवस गावकऱ्यांची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार वन विभागाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार जेरबंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, त्यास राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांचेकडून दिनांक २४.१०.२०२५ रोजी परवानगी देण्यात आली.
२०२५ रोजी सायंकाळी २ वाघ बछडा व आई असे एकूण ४ वाघ जेरबंद करण्यात आले. Three cubs arrested along with tigress..

सदरची कारवाई रामानुजम आर. एम. भा. व. से. यांच्या मार्गदर्शनात, राजन तलमले, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर व विकास तरसे, सहायक वनसंरक्षक यांचे नेतृत्वात विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली, दत्ता जाधव, परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी व त्यांच्या चमूने यशस्वीरित्या पार पाडली. सदर मोहिमेकरीता डॉ. कुंदन पोडचेलवार पशुधन विकास अधिकारी, TTC चंद्रपूर, अक्षय नारनवरे, जीवशास्त्रज्ञ, चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर, RRU टीम चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर, घनश्याम नायगमकर, अनंत राखुंडे क्षेत्र सहाय्यक व्याहाड, पाटील, मेश्राम, सिडाम, वनरक्षक मुंडे, सोनकर, खुडे, डांगे, आखाडे, बोनलवार, अहिरकर, इंगळे, कराड, मुरकुटे, नागोसे व बोरकर तसेच PRT चमू डोनाडा, गवारला, हरंबा, उपरी, बीट मदतनीस यांनी मोलाचे सहकार्य newsjagar



