
ता.सावली (दिं. २७ ऑक्टोबर)
सावली तालुक्यातील मौजा करगांव येथे सार्वजनिक लोकसहभागातून “बाळा..! मीच तुझी आई रे..” हे सामाजिक आशय असलेले संगीत नाटक मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले.
या नाटकाचे नियोजित उद्घाटक माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री माननीय डॉ. अशोकजी नेते होते. मात्र मुंबई येथे भाजपाच्या संघटनात्मक बैठकीमुळे त्यांना उपस्थित राहता आले नाही. तरीदेखील त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून नाटक मंडळाला प्रोत्साहन दिले.

नाटकाचे आयोजित उद्घाटक माजी बांधकाम सभापती, जिल्हा परिषद चंद्रपूर श्री. संतोषभाऊ तंगडपलीवार यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना संतोषभाऊ म्हणाले — “नाटक ही समाजप्रबोधनाची प्रभावी साधना आहे. हे नाटक लोकांमध्ये मातृत्वाची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी वाढवते. ‘बाळा..! मीच तुझी आई रे..’ हे नाटक प्रत्येक माणसाच्या मनातील कोमल भावनांना जागं करतं. आई ही फक्त जन्म देणारी नसून ती संस्कार देणारी, आधार देणारी आणि जीवनाची खरी प्रेरणा असते. आई बाळाला जपते, त्याचे पालन-पोषण करते आणि समाजात त्याला सन्मानाने उभं राहायला शिकवते. म्हणूनच मातृत्वाच्या संवेदना जपणं आणि आईच्या त्यागाचा सन्मान करणं गरजेचं आहे.”
याच संदेशातुन महाराष्ट्र शासनाने “लाडकी बहीण योजना” अस्तित्वात आणली असून या योजनेमागचा हेतू म्हणजे महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्या जीवनमानात उन्नती घडवणे आणि त्यांना आत्मनिर्भरतेचा आधार देणे हा आहे. ‘बाळा..! मीच तुझी आई रे..’ या नाटकातून हाच संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचतो, असे या माध्यमातून विचार निर्माण होते.
या नाटकाच्या कार्यक्रमात मंचावर माजी बांधकाम सभापती दिनेश पाटील चिटनुरवार, धान्य व्यापारी मंगरजी, उपसरपंच प्रफुल तुम्मे, मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांचे सहाय्यक व सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम, अनिल पा. म्हशाखेत्री, पुष्पा ताई शेरकी, ईश्वर गंडाटे, शरद सोनवाने, प्रमोद दाजगाये, नंदू भाऊ ठिकरे,शरद नागापूरे, नंदू भाऊ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नाट्यप्रेमी नागरिक, ग्रामस्थ, महिला भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नाटकाचा मनसोक्त आनंद घेतला.
करगाव ग्रामस्थांच्या पुढाकारातून आणि लोकसहभागातून साकारलेले हे नाटक समाजात आईची ममता, स्त्रीचा सन्मान आणि मातृत्वाचे महत्त्व अधोरेखित करणारा प्रभावी संदेश या नाटकातून निर्माण झाला.


