
सोनू वाळके, जिल्हाप्रतिनिधी.
बाबासाहेबांनी मूलच्या विश्रामगृहात केली भाकरीची न्याहारी !
लक्ष्मणराव जुलमेंच्या सांगण्यावरून पिसाबाईं गोवर्धन यांनी तयार केली भाकरी.

मूल : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपुरातील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर १६ ऑक्टोबर, १९५६ रोजी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या सोहळ्यासाठी नागपूरवरून उमरेड, नागभीडमार्गे मूल शहरात आल्यानंतर त्यांनी विश्राम गृहात काही तास आराम केला आणि भाकरी व मिरचीच्या ठेच्याची न्याहारी घेतली. लक्ष्मणराव जुलमे यांच्या सूचनेवरून पिसाबाई गोवर्धन यांनी ही न्याहारी तयार केल्याची नोंद आहे.
चंद्रपुरात दरवर्षी दोन दिवस धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा होतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो
अनुयायी श्रद्धेने येतात. भगवान गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन प्रेरणा घेतात. नागपुरात ऐतिहासिक धम्मचक्र सोहळा झाल्यानंतर बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या इच्छेनुसार बाबासाहेबांनी चंद्रपुरातही धम्मदीक्षा देण्याचा निर्णय मान्य केला
लक्ष्मणराव जुलमे हे पिसाबाई गोवर्धन यांच्या घरी गेले. ‘आज तुमच्यासाठी फार सुंदर योग आला आहे. तुमच्या हातची भाकरी व भाजी बोधीसत्व बाबासाहेब ग्रहण करतील. त्यामुळे लवकरात लवकर ज्वारीची भाकरी आणि जे काही असेल त्याची भाजी बनवा अशी विनंती केली. तेव्हा पिसाबाई आनंदी झाल्या. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ज्वारीची भाकरी व मिरचीचा ठेचा तयार करून जुलमेंच्या हातात दिला. बाबासाहेबांनी ही भाकरी आनंदाने ग्रहण केली व काही वेळ आराम केल्यानंतर सायंकाळी चंद्रपूरकडे रवाना झाले. या घटनेनंतर पिसाबाईने आयुष्याचे सार्थक झाले, या शब्दांत आनंद व्यक्त केल्याच्या आठवणी त्यांच्या कुटुंबाने जपून ठेवल्या आहेत.
निर्णय मान्य केला. या सोहळ्यासाठी बाबासाहेब १५ ऑक्टोबर, १९५६ रोजी सकाळी ५ वाजता खासगी मोटारीने चंद्रपूरकडे निघाले. नागपूरवरून उमरेड, भिवापूर, नागभीडमार्गे मूल शहरात आले. हा लांबचा प्रवास करून थकलेल्या बाबासाहेबांनी मूलच्या विश्रामगृहात आराम केला. नागपुरातून येताना रस्त्यात कुठे न्याहारीची व्यवस्था
नसल्याने, त्यांनी तशी इच्छा लक्ष्मणराव जुलमे यांच्याकडे व्यक्त केली, शिवाय इथे कुठे दलितांचे घर आहे काय? याचीही बाबासाहेबांनी चौकशी केली, तेव्हा जुलमे यांना विश्रामगृह शेजारच्या पिसाबाई लिंगाजी गोवर्धन यांच्या घराची आठवण झाल्याची नोंद इतिहासात आहे

