
बुलढाणा – मोताळा तालुयातील ग्राम. खामखेड, गूळभेली, नळकुंड, उबाळखेड व राहेरा येथे अतिवृष्टीमुळे शेतजमिनी व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचे प्रत्यक्ष पाहणी आ.संजय गायकवाड यांनी केले.
नुकसानग्रस्त शेतकर्यांना शेवटच्या घटकातील मदत पोहोचावी यासाठी ड्रोनद्वारे सर्वे करून तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासकीय अधिकार्यांना निर्देश दिले. तसेच तहसीलदार व कृषी अधिकार्यांना सर्वेक्षणानंतर सरसकट मदत कशी दिली जाईल याची कार्यवाही तत्काळ करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी राहेरा येथे नव्याने बांधकाम झालेल्या धरणाचीही आमदार गायकवाड यांनी पाहणी केली. सद्यस्थितीत या धरणामध्ये सुमारे ६०% जलसाठा जमा झालेला असून, त्यातून होणार्या शेतीला व गावकर्यांना यापुढे कशी मदत होईल याचा त्यांनी आढावा घेतला. याप्रसंगी आ. गायकवाड यांनी शेतकर्यांना दिलासा देत सांगितले अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावला असला तरी निराश होऊ नका. आपले शासन तसेच तुमचा आमदार सदैव तुमच्या सोबत आहे आणि जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. या पाहणीवेळी जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, तहसीलदार जंगम, भोजराज पाटील, शरदचंद्र पाटील, सुभाषसिंग राजपूत, जगन्नाथ झाडे, निंबाजी पवार, राहुल वाघ, तालुका संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर वाघ, प्रवीण पाटील, गजानन चव्हाण, विनोद रायपुरे, रोहित गवळी, संतोष जाधव, सपना गायकवाड, गजानन चव्हाण, विजय चव्हाण, ओम बाहेकर, शिवाजी पवार, अंकुश शेळके, सतिष शेळके, विकास नागवे, अमोल चिडे, ज्ञानदेव चिडे, दीपक पवार, अभिमान पवार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

