tiger attack

योगेश रामटेके, प्रतिनिधी न्युज जागर
सिंदेवाही, दि. 19 : काकाचा हात धरुन घराकडे परतणाऱ्या प्रशिक बबन मानकर (वय 7, इयत्ता दुसरी) या चिमुकल्याला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अक्षरशः हिसकावून नेले व ठार केले. सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे मिळालेल्या माहितीनुसार, गावातील कार्यक्रम आटोपून नंदकिशोर मानकर हे आपल्या दोन्ही पुतण्यांना घेऊन घरी परतत असताना ही घटना घडली. त्यांच्याकडे आधीच एका मुलीला खांद्यावर घेतलेले असताना अचानक बिबट्याने झडप घालत प्रशिकला जंगलाच्या दिशेने खेचत नेले. नागरिकांच्या आरडाओरडीनंतरही बिबट्याने अंधाराचा फायदा घेत मुलाला ठार केले. #tiger attack
गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी शोधाशोध केली, मात्र उशिराने प्रशिकचा मृतदेह मिळाला. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. #newsjagar

या घटनेने संपूर्ण गडबोरी गाव दहशतीत असून नागरिकांमध्ये वनविभागाविरुद्ध प्रचंड संताप आहे. यापूर्वीही याच भागात लहान मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. वारंवार होणाऱ्या मानवी जीवितहानीला वनविभागाच्या उदासीन धोरणाला जबाबदार धरत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

