
आरमोरी :- आरमोरी येथील परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाला आमदार रामदास मसराम यांनी आज भेट दिली. या वेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत ग्रामीण व शहरी भागात बससेवा नियमितपणे पोहोचणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला जाताना होणाऱ्या प्रवासातील अडचणींचा विशेष उल्लेख करत, “प्रत्येक ठिकाणी बस गेली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत अडचण आली नाही पाहिजे,” असे आदेश परिवहन अधिकाऱ्यांना दिले.
आमदारांनी बसस्थानक परिसराची पाहणी करून प्रवाशांच्या सोयीसुविधांबाबतही सूचना केल्या. जनतेला वेळेवर आणि सोयीस्कर सेवा मिळावी यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, धनपालजी मिसार,मधुकर राघोर्ते, दौलत कुथे, शालिक पत्रे, विजय सुपारे, सौरभ जक्कनवार, भीमराव बारसागडे,मनोज सपाटे,नीरज पित्तूलवार, मोनू बागडे उपस्थित होते

