
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नई दिल्ली महिला विभाग गडचिरोली व जंगोरायताड आदिवासी महिला संघटनेचे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन
गडचिरोली – नुकतेच राज्य सरकारने मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला हैदराबाद गेझेट नुसार नोंदी ग्राह्य धरून ओबीसी जात प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय जाहीर केला.
या शासन निर्णयाचा आधार घेत महाराष्ट्र राज्यातील N.T. प्रवर्गात असलेला बंजारा समाज व त्यांचे राजकीय नेते राज्य शासनावर दबाव निर्माण करून अनुसूचित जमाती (S.T.) प्रवर्गात समावेश करण्याची मागणी रेटत आहे.
हैदराबाद गेझेट हे कालबाह्य झालेले आहे, भारत देश हैदराबाद गेझेट नुसार नाही तर भारतीय संविधानानुसार चालतो. भारतीय संविधानानुसार एका राज्यात एक जमात अनुसूचित जमाती यादीत समाविष्ट जरी असली तरी दुसऱ्या राज्यात ती अनुसूचित जमाती यादीत समाविष्ट असेल असे नाही. ते तेथील तत्कालीन सामाजिक परिस्थिती नुसार अवलंबून असते व तो त्या त्या राज्याचा अधिकार आहे.
आदिवासी समाजाचे संविधानिक पालक म्हणून मा.राज्यपाल व मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी आदिवासी समाजाची भूमिकेची तात्काळ दखल घेवून कोणत्याही राजकीय व सामाजिक दबावाला बळी न पडता महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमाती यादीत बंजारा समाज व ईतर गैर आदिवासी समाजाला अनुसूचित जमाती यादीत समाविष्ट न करण्याबाबत निर्देश द्यावे ही नम्र विनंती.
महाराष्ट्र सरकार राजकीय दबावाला बळी पडून असंवैधानिक कृत्य करीत असेल तर खरा आदिवासी समाज आपल्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक भूमिका घेणार व त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील.
असे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नई दिल्ली महिला विभाग शाखा गडचिरोली व जंगोरायताड आदिवासी महिला संघटना गडचिरोली द्वारा मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा.जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी शिष्टमंडळ द्वारा देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महिला विभाग नई दिल्ली शाखा गडचिरोली च्या जिल्हाध्यक्षा पुष्पलता कुमरे, जंगोरायताड आदिवासी महिला संघटनेच्या अध्यक्षा आरती कोल्हे, आरती कंगाले, विद्या दुग्गा, रेखा तोडसे, रोहिणी मसराम, शामला घोडाम, शारदा मडावी, लीना कोकोडे, माधुरी पडोती, प्रीती बारसागडे, उमेश उईके, सुरज मडावी, वनिश्याम येरमे आदी उपस्थित होते.
*वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करावी ही अपेक्षा 🙏🙏*

