
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
आष्टी :-
आझाद समाज पक्षाचे युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे यांचाकडून वारंवार निवेदन देऊनही गावातील मूलभूत समस्यांवर अजूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ग्रामसेवक व सरपंच यांनी या निवेदनांकडे सतत दुर्लक्ष केले असल्याचा आरोप आझाद समाज पार्टी कडून होत आहे.

गावातील पाणीपुरवठा, , स्वच्छता, शाळेत भोवती साचलेला घन कचरा, शिक्षक व विद्यार्थांना होणारा त्रास अशा अनेक तातडीच्या समस्यांकडे ग्रामपंचायतीकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
यासंदर्भात तालुका कार्यालयाकडे देखील तक्रार व निवेदन करण्यात आले. यावरून गटविकास अधिकारी (BDO) यांनी ग्रामसेवक व सरपंचांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. मात्र, संबंधित ग्रामसेवकाने या आदेशाकडेही काना-डोळा केल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे.
आझाद समाज पार्टीने चेतावणी दिली आहे की, लवकरात लवकर गावातील प्रश्न सोडवले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

