
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
प्रेस नोट
मुल : ओबीसी आरक्षणात मराठा समाजाची

घुसखोरी करणारा 2 सप्टेंबरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी संघटनांच्या वतीने देण्यात आला. या मागण्यांसाठी मुल तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
मुंबईतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेले निर्णय ओबीसी समाजावर अन्यायकारक असल्याचे
सांगून आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधात संताप व्यक्त केला. मराठा समाजाला कुणबी ठरविणारे शासन अध्यादेश, तसेच ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणारे निर्णय रद्द करावेत.
जातनिहाय जनगणना तात्काळ करावी आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आधीचे निर्णय मान्य करावेत, अशा प्रमुख मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोणबले यांनी आपले विचार व्यक्त करताना शासनाने ओबीसी समाजाचा अंत पाहू नये अन्यथा आपल्या हक्काच्या रक्षणासाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला. यावेळी मोठया संख्येने महिला पुरुष ओबीसी बांधव उपस्थित

