
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
चामोर्शी :-
गडचिरोली जिल्ह्यातील सगळ्यात मोठी तहसील व नगरपंचायत चामोर्शी असून चामोर्शी चा विकास जसा व्हायला पाहिजे तसा विकास अजून पर्यंत झाला नाही,विकास खुंटत आहे,आज एवढ्या ग्रामपंचायत पासून तर नगर पंचायत पर्यंत चामोर्शी च चेहरा मोहरा बदलले नाही, नगरपंचायत नि चांगले चांगले नगरसेवक निवडून गेले आहे आणि आजही आहेत परंतु विकासाची गोष्ट जिथे येथे तिथे कुठेतरी विकास कुंठत आहे,
केंद्र शाळा चामोर्शी पासून तर जुना तहसील रोड चे काम हे पक्का सिमेंट रोड बांधकाम असून फक्त राजमाता आश्रम शाळा इथपर्यंत पक्के रोड झाले आहे,तिथून तहसील पर्यंत खड्डेमय रस्त्याचा प्रवास वार्डातील नागरिकांना तसेच शाळेतील मुला मुलींना नाहक त्रास सहन करून ये जा करावं लागतं आहे,तरी नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे,आश्रम शाळा ते जुना तहसील रोड हे अर्धवट बांधकाम का ठेवण्यात आले,याचा निधी उपलब्ध झाला की नाही की हे रस्त्याचा निधी दुसरीकडे वळवण्यात आले अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये होत आहे,तात्पुरता उपाय योजना म्हणून खड्डेमय रस्त्यावर डागडुगी करतात परंतु परिस्थिती जैसे थे,

केंद्र शाळा ते जुना तहसील रोड हा महत्त्वाचा मार्ग असून सध्या राजमाता आश्रम शाळा ते जुना तहसील पर्यंत खड्रेमय झाला असून, प्रवाशांना अक्षरशा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांची शक्यता वाढली असून, वाहतूक कासवगतीने सुरू आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
पावसाळ्यात हे रस्ते ठिकठिकाणी खोल खड़े, चिखल व पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कधी कंत्राटदार काम करत नाही. मात्र, याची शिक्षा या भागातील नागरिकांना सोसावी लागत आहे. रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी होत आहे.
तसेच मार्कंड मोहल्ला ते मार्कंडा रोड यावर सुद्धा लोकप्रतिनी चे लक्ष्य नाही पावसामुळे हा रस्ता चिखलमय झाला असून रस्त्यात खड्डे,की खड्यात रस्ते असा प्रश्न निर्माण झाला आहे तरी प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहे,याचा नाहक त्रास हेटी ,मार्कंडा येथील चामोर्शी येथे शिक्षण घेण्याऱ्या मुला मुलींना ये जा करण्यासाठी होत आहे,
स्त्यांची दुरवस्था इतकी भीषण आहे की, प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. एकीकडे औद्योगिक विकासाचे स्वप्न दाखविले जाते, पण दुसरीकडे पायाभूत सुविधाही नाहीत लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरू करून तात्पुरता उपाय योजना करून ही समस्या दूर करावी असे नागरिकांचे मत आहे.
नगर पंचायत च्या चार्जे वर असलेले CO मा पिदूरकर यांच्याशी संवाद केला असता “मला याबद्दल माहिती नाही,मी चार्जे वर आहे ,असे उडवाउडवीची उत्तर त्यांच्याकडून मिडाले.

