
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
चामोर्शी :-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात लक्ष्मी गेट जवळ असलेल्या महात्मा गांधी पुतळा याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व नगर पंचायत चे दुर्लक्ष होत आहे, या म.गांधी पुतळ्या जवळ दारुच्या बाटलाच खप तसेच खऱरे खाऊन फेकलेले प्लास्टिक जमा होत आहे यामुळे त्या परिसरात अस्वच्छता निर्माण होत.तसेच म.गांधी च्या पुतळ्याला झाकलेले कापड खराब होऊन फाटून जात आहे,तरी प्रशासन व स्थानिक प्रतिनिधी झोपेत आहे.

परिसराची नियमित साफसफाई न झाल्यामुळे घाण जमा होणे ,सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची सवय अनेकांना असते, ज्यामुळे स्वच्छता बिघडते, ही समस्या अनेकवेळा नागरिकांच्या निदर्शनास आली आहे, मात्र प्रशासनाला नाही , स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुतळ्यांच्या परिसराची नियमित साफसफाई करणे आवश्यक आहे, नागरिकांमध्ये स्वच्छता आणि सार्वजनिक मालमत्तेच्या जतनाबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. पुतळ्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. आणि यात प्रशासनाची कमतरता दिसून येत आहे.
महात्मा गांधी पुतळ्याच्या परिसरात कचरा असूनसुद्धा लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधीकाऱ्यांचे, तथा मोठमोठ्या बँनर वर स्वतःला सामाजिक कार्यकर्ते सांगणारे कार्यकर्यांना मात्र गांधीजींच्या पुतळ्याभोवती असलेली घाण दिसत नाही याचे आश्चर्य आहे .
महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ नियमित साफसफाईसाठी विशेष व्यवस्था करावी, कचर्या व्यवस्थापनासाठी कठोर निर्णय घेऊन परिसर स्वच्छ ठेवावा, प्रशासनाने व स्थानिक प्रतिनिधी नि तत्परतेने परिसरात स्वच्छता अभियान चालवावे व पुतळ्याच्या आसपास स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करावी अशी स्थानिकांची मागणी आहे.
NEWS JAGAR (आवाज सत्याचा)

