
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण, शाश्वत आणि गतिमान विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने ‘नवी दिशा–नवा गडचिरोली’ या संकल्पनेअंतर्गत ‘विकसित गडचिरोली व्हिजन–२०४७’चे सादरीकरण व संबोधन आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या विकासाचा दूरदृष्टीपूर्ण आराखडा मांडणाऱ्या या कार्यक्रमाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली शहरातील राजीव गांधी सभागृह, इंदिरा गांधी चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे.

गडचिरोलीच्या समृद्ध नैसर्गिक संपदा, वनसंपदा आणि आदिवासी संस्कृतीच्या वारशाला जपत शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, शेती, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा संकल्प या व्हिजनमध्ये मांडण्यात आला आहे.
‘नवी दिशा नवा संकल्प नवा गडचिरोली’ या घोषवाक्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर, समृद्ध, सक्षम आणि विकसित गडचिरोली घडविण्यासाठी सर्वांच्या सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ विकासाचा आराखडा मांडणारा नसून गडचिरोलीच्या भविष्यासाठी दिशा ठरविणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरण्याची अपेक्षा आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक डॉ. देवराव होळी, प्रदेशाध्यक्ष, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र तथा माजी आमदार, गडचिरोली विधानसभा हे आहेत.
जिल्ह्याच्या विकासासाठी नवे विचार, नवी दिशा आणि नवा संकल्प घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोलीच्या विकासाची नवी पहाट ‘व्हिजन–२०४७’च्या माध्यमातून नव्या गडचिरोलीच्या निर्मितीचा निर्धार!

