गडचिरोलीतून धक्कादायक वृत्त हाती आली आहे. आठ दिवसांवर लग्न ठरलेले असताना लग्नाआधी जन्मलेल्या बाळामुळे आपली बदनामी होईल, या भीतीने जन्मदातीनेच अर्भकाचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना आहे. गडचिरोली शहरात हा प्रकार घडला आहे. या युवतीला गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवतीचे गडचिरोलीतील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचीही जात वेगवेगळी असल्याने आधी कुटुंबाचा विरोध होता. मात्र कुटुंबाने होकार दिल्यानंतर दोघांनीही लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
21 जानेवारीचा लग्न मुहूर्त ठरलेला होता. परंतु एका लग्न समारंभासाठी नियोजित वधू वराच्या घरी आली आणि तिची प्रसूती झाली. पोलिसांनी युवतीला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीनंतर तिची प्रसूती झाल्याचे निष्पन्न झाले.
अर्भक नियोजित पतीपासून जन्मलेला आहे का की इतर कुणाचा हे डीएनए चाचणीतून सिद्ध होणार आहे. अर्भक हत्या प्रकरणात नियोजित वराचाही सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.